अंधश्रद्धे मुळे बळी गेलेल्या मित्राची भावनीक गोष्ट म्हणजे 'पिटर' हा चित्रपट 22 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय
आनंदी इंटरप्रायझेस ची ही पाहिली निर्मिती असून हिंदी इंडस्ट्री मधील नामांकित निर्मिती संस्था आणी डिस्ट्रुबिशन कंपनी 'जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' हा चित्रपट प्रेझेंट करत आहे. याचे निर्माते अमोल अरविंद भावे आहेत यांनी अत्ता प्रयन्त सात चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले असून 45 टीवी मालिकांचे देखील दिग्दर्शन, लेखन केले आहे त्यांच्या बरोबर दिप्पांकर रामटेके आणी रोहनदीप सिंह हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच या चित्रपटाला सुरेल संगीत 'श्री गुरुनाथ श्री' या संगीतकाराने दिले असून गीत लेखनाची जबाबदारी रंगनाथ गजरे, विष्णू थोरे यांनी पार पाडली आहे ही सुंदर गाणी सई जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम या गोड गळ्याच्या गायकांनी गायली आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण साऊथ चे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर अमोश पुटीयाथील यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन राजेश भालेराव, संकलन किशोर नामदेव, कला दिग्दर्शन रमेश कांबळे, साऊंड ऋषिकेश मोरे, नृत्य दिग्दर्शक नील कामळे, निर्मिती प्रबंधक भक्ती वरणकर, रंगभूषा आरती बोरसे, प्रसिद्धि अश्वनी शुक्ला, वेशभूषा मिलन देसाई, सहायक दिग्दर्शक योगेश मोटे, सुरज मरचंडे, सुरज पानकडे, सुरज पांचाळ, कलाकार प्रेम बोराडे, मनीषा भोर, सुरेश ढगे, अमोल पानसरे, विनिता संचेती, सिद्धेश सिध्देश्वर, शरद राजगुरू, प्रमेय वाबळे, उमेश पांढरे, मल्हारी ठिकेकर यांनी काम केले आहे. चावंड गावच्या निसर्गरम्य गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मनोरंजन करता करता अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी दिग्दर्शक अमोल भावे यांना आशा आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहावा.
Excellent topic with ambitious projection
ReplyDeleteAll the best Amol ji
ReplyDelete